📢 नागरिकांना आवाहन – आगामी ग्रामसभेस उपस्थित राहून आपले सूचना / अभिप्राय नोंदवावेत. 📢 पाणीपुरवठा दुरुस्तीच्या कामामुळे दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. 📢 ग्रामपंचायतीच्या कराची थकबाकी ३० सप्टेंबर पर्यंत भरणा करावा, अन्यथा दंड आकारला जाईल. 📢 ग्रामपंचायत रसलपूर येथे दिनांक २० सप्टेंबर रोजी स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा.

गावाविषयी माहिती

प्रभू श्री रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पावन झालेले व-हेदारणा  हे गाव महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात संभाजी नगर हायवे लगत तसेच पवित्र गोदावरी माता नदीच्या काठी वसलेले टुमदार असे एक छोटेसे प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १५४५ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १, अंगणवाडी केंद्रे १ व व्यायामशाळा १,श्रीमती. अनुसया भालेराव माध्यमिक शाळा व-हेदारणा आहेत. तसेच मारोती मंदिर,राम मंदिर सर्व देवी देवतांचे मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी  अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती तसेच मजूर वर्ग मोठ्या प्रमानात आहे. शेतात  कोबी, फुलकोबी, ऊस, सोयाबीन, कांदा, शिमला मिर्ची व मका ही प्रमुख पिके घेतली जातात.  या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. तसेच व-हेदारणा गावात भाजीपाला खरेदी साठी विविध कंपन्यांचे मॉल असून भाजीपाला,फळे खरेदी केली जातात.

व-हेदारणा ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थींना घरकुल लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत व-हेदारणा  गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF) दर्जा मिळवला आहे. जल जीवन मिशन व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

व-हेदारणा हे  गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

व-हेदारणा  हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर व नाशिक शहरापासून २० किमी अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ २४४.०४ चौ.कि.मी. असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण ७१ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या १५४५आहे. त्यामध्ये ८१५ पुरुष७३० महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे. गावालगत गोदावरी नदी आहे ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो. येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे. उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३८° से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात ° से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

व-हेदारणा गाव,शिमला मिरची, उस,सोयाबीन, कांदा,कोबी, फुलकोबी व भाजीपाला उत्पादनासाठी संपूर्ण नाशिक जिल्यात प्रसिद्ध आहे.

Creative Graphic Designs

लोकजीवन

व-हेदारणा  गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून कोबी, फुलकोबी, ऊस, कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व लघुउद्योग यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

व-हेदारणा  गावाच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

पुरुष

स्त्रिया

सन २०११ नुसार

एकूण

संस्कृती व परंपरा

व-हेदारणा गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व अखंड हरीनाम साप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे व-हेदारणा गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

  • ग्रामदैवताचे मंदिर – गणपती मंदिर,राम मंदिर,मारुती मंदिर,भैरवनाथ मंदिर,हे गावातील प्रमुख मंदिर आहे. हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी यात्रा, धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

 

  • हनुमान मंदिर – गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मंदिर उत्सव व सणासुदीला ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.

 

  • गोदावरी नदी – दक्षिणोत्तर दीड कोस वाहणाऱ्या गोदावरी नदीमुळे जलसंधारणाची चांगली सोय होते यामुळे शेती, मासेमारी, पर्यटन विकास यामुळे परिसरात नैसर्गिक सौंदर्य खुलून दिसते.

 

  • स्मशान भूमी – व-हेदारणा गावातील स्मशान भूमी हे पंचक्रोशीतील प्रमुख आकर्षण आहे. येथील निसर्गरम्य वातावरणामुळे या वैकुंठधाम परिसरास अनोखे आकर्षण आहे.

जवळची गावे

व-हेदारणा हे  गाव संभाजी नगर हायवे लागत तसेच  गोदावरी नदीच्या किनारी वसलेले असून आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे व-हेदारणा  गावाशी सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

चितेगाव , चेहडी, शिंपीटाकळी , दारणासांगवी, लालपाडी ही व-हेदारणा  आसपासची प्रमुख गावे आहेत.

गटविकास अधिकारी

गटविकास अधिकारी

ग्रामपंचायत प्रशासन

सौ. कल्पना भीमा पवार

सरपंच

(+91 ) ९२८४३ ११००५

श्री. रवींद्र केशव सानप

उपसरपंच

(+91 ) ९८५०० ८४४०४

श्री. दत्तू बबन गोहाड

सदस्य

(+91 ) ९९२१६ ३९९९६

सौ. वनिता विजय तलवारे

सदस्य

(+91 ) ७६२०८ २४२६३

श्रीमती. सोलोचना साहेबराव भोसले

सदस्य

(+91 ) ७०८३४ ६०५५८

श्री. दगडू विष्णू भोसले

सदस्य

(+91 ) ९६५७१ ३४८४३

श्रीमती. मनीषा कृष्णा पवार

सदस्य

(+91 ) ९६७३५ ९७४४७

सौ. ज्योती भागवत गामणे

सदस्य

(+91 ) ९९२१३ ९०६५५

श्री. दिलीप कचरू शेंडगे

सदस्य

(+91 ) ९०६७४ ३१५४७

सौ. गीतांजली मनोहर गामणे

सदस्य

(+91 ) ७३०४१ ३०७०८

समन्वय कर्मचारी

अ.नं. नाव विभाग पद संपर्क क्रमांक
1. श्रीमती. स्मिता सुधाकर गडाख ग्रामपंचायत अधिकारी (+91) ९४२२८ ५४७४५
2. श्रीमती. पूर्वा अमर राठोड ग्राम महसूल अधिकारी
3. श्री. सागर बंडू पवार पोलीस पाटील (+91) ९३०७७ ८९०५४
4. श्री. गांगोर्डे साहेब सहाय्यक कृषी अधिकारी (+91) ९८८१३ १५४३३
5. श्री. दिगंबर बाळासाहेब सोनवणे ग्रामपंचायत कर्मचारी (+91) ७७०९३ ३६०१४
6. श्री. वसंत प्रभाकर पवार ग्रामपंचायत कर्मचारी (+91) ९१४६५ ५०९२५
7. श्री. शिवाजी बोडके कोतवाल (+91) ९०७५६ ०८१७१

ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचेकडे मिळणारे दाखले

जन्म नोंद दाखला

मृत्यु नोंद दाखला

विवाह नोंदणी दाखला

दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला

ग्रामपंचायत थकबाकी नसल्याचा दाखला

निराधार असल्याचा दाखला

नमुना ८ चा उतारा

शिक्षण विभाग

अंगणवाडी विभाग

विद्यार्थी संख्या

अंगणवाडी नाव मुले मुली एकूण
अंगणवाडी व-हेदारणा 37 35 71

अंगणवाडी सेविका माहिती

अ.नं. नाव पद नाम संपर्क क्रमांक
1. श्रीमती.प्रमिला सोमनाथ सांगळे अंगणवाडी सेविका (+91) ७७१९० ९९६८१
2. सौ. सरला अंबादास पवार अंगणवाडी मदतनीस (+91) ८२६३० ४८२०४

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दारणासांगवी

विद्यार्थी संख्या

इयत्ता मुले मुली एकूण
पहिली 04 04 08
दुसरी 09 09 16
तिसरी 06 05 11
चौथी 17 16 33
पाचवी 08 13 21
सहाव्वी 11 10 21
सातवी 07 09 16
एकूण 55 59 114

शिक्षक माहिती

अ.नं. नाव पद नाम संपर्क क्रमांक
1. श्रीमती. मीना केशव शेवाळे मुख्याध्यापक (+91) ७५८८६ १८७१८
2. श्री. प्रतापराव गुलाबराव शिंदे शिक्षक (+91) ७५८८५ ५६९०३
3. श्रीमती. जयश्री भास्कर वाघचौरे शिक्षक (+91) ९६०४५ ९८३१२
4. श्री.बाळासाहेब तानाजी पगार शिक्षक (+91) ७४४७४ ३०६५१
5. श्री. मच्छिंद्र विश्वनाथ बोरसे उपशिक्षक (+91) ७५८८० ०३७४१
6. श्रीमती. अनिता दादाजी बागूल उपशिक्षक (+91) ९९२२० ८४९७७

आरोग्य विभाग

अ.नं. नाव आरोग्य विभाग पद संपर्क क्रमांक
1. डॉ. सुजित कोशिरे तालुका वैद्यकीय अधिकारी (+91) 94227 57565
2. डॉ. इरेश पाटील पी.एच.सी. वैद्यकीय अधिकारी (+91) ७९७२२ ४९०३०
3. डॉ. प्रियांका साबळे उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी (+91) ८४८४० ५४४०३
4. हेमंत पुरुषोत्तम भोईटे आरोग्य सेवकी (+91) ७६२०० ५६२१८
5. काजल सचिन पवार आशा वर्कर (+91) ७४९९६ ८२६७०

बचत गट

CRP : सौ. ज्योती भागवत गामणे

अ.नं. नाव
1. श्रीशक्ती महिला स्वय: सहाय्यता समूह
2. भैरवनाथ महिला स्वय: सहाय्यता समूह
3. आदर्श महिला स्वय: सहाय्यता समूह
4. जानकी महिला स्वय: सहाय्यता समूह
5. एकलव्य महिला स्वय: सहाय्यता समूह
6. सप्तश्रुंगी महिला स्वय: सहाय्यता समूह
7. शबरीमाता महिला स्वय: सहाय्यता समूह
8. सिद्धेश्वर महिला स्वय: सहाय्यता समूह
9. शिवकन्या महिला स्वय: सहाय्यता समूह
10. पवनपुत्र महिला स्वय: सहाय्यता समूह
11. जगदंबा महिला स्वय: सहाय्यता समूह
12. सप्तसती महिला स्वय: सहाय्यता समूह

कृषी विभाग